वैभववाडी (प्रतिनिधी)
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत खांबाळेतील उ.बा.ठा च्या ग्रा.पं.सदस्या दर्शना दशरथ मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उबाठाच्या ग्रामपंचायत सदस्या दर्शना मोरे यांच्यासह निर्मला पवार, दशरथ पारके, आरती सुतार मारुती पवार संगीता सुतार यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, मनोज रावराणे, उमेश पवार, लहू पवार, जयेंद्र पवार व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.





