देवगड : प्रतिनिधी
देवगड पोलिसांनी पोयरे मसवीवाडी येथे एका घरात छापा टाकून सुमारे २ लाख ६८ हजार रूपयाची गोवा बनावटीची दारू जप्त
देवगड पोलिसांनी पोयरे मसवीवाडी येथे एका घरात छापा टाकून सुमारे २ लाख ६८ हजार रूपयाची गोवा बनावटीची दारू जप्त केली. गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे, बिनापरवाना बाळगल्याप्रकरणी तेथिलच योगेश विलास मयेकर(४१) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रविवारी दुपारी पोलिसांनी पोयरे मसवीवाडी येथील योगेश विलास मयेकर याच्या घरामध्ये छापा टाकून घरात ठेवलेली २ लाख ६८ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. यामध्ये ३४ बॉक्स १६३२ बॉटल किंमत १ लाख ६३ हजार रूपये , ९६० बॉटल किंमत ९६ हजार, ४८ बॉटल किंमत ४८०० व १० बॉटल ४ हजार रूपये असा एकूण २ लाख ६८ हजार रूपये किंमतीचा गोवा बनावट दारूचा मुद्देमाल सापडला. गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे व बिगरपरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी योगेश विलास मयेकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, म.पो.कॉ.अमृता बोराडे, पो.कॉ.निलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, विश्वनाथ पाटील, योगेश महाले यांनी केली.









