महाविकास आघाडीची उद्या कणकवलीत संयुक्त पत्रकार परिषद
कणकवली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि.२६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद कॉन्फरंस हॉल, हॉटेल सुगरण, कणकवली येथे होणार आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख, तसेच माजी आमदार विजय सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार जीजी उपरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी नेते नंदुशेठ घाटे, काँग्रेस नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, विधानसभाप्रमुख सतिश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नागेश मोर्यें, शिवसेना नेते बाळा भिसे, महिला जिल्हा संघटक निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रेवती राणे, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबूलकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नयन गावडे, महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.