कणकवली दि २४ ऑक्टोबर ( तुळशीदास कुडतरकर)
नांदगाव वीज ग्राहकांचा विज बिलांवर सामूहिक बहिष्कार ; कणकवली येथील कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीला दिले लेखी निवेदन
नांदगाव दशक्रोशीतील वीज समस्या दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सतत कणकवली हून येणाऱ्या 33 kv लाईन फॉल्टी होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे तोही जवळपास सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा केव्हा केव्हा दुसऱ्या दिवशीही सुरू होतो.नेहमीच्या या समस्येमुळे व्यापारी वर्ग पुरता मेटाकुटीला आलेला आहे.असे वारंवार होत असल्याने आपली लाईट बिले तरी का भरावीत ? असा प्रश्न आम्हा सर्व वीज ग्राहकांना पडलेला आहे. म्हणूनच आम्ही या महिन्यापासूनच येणाऱ्या सर्व वीजबिलांवर सामुदायिक रित्या बहिष्कार घालत आहोत जोपर्यंत आपण सतत होणाऱ्या 33 kv विद्युत लाईन दुरुस्ती करुन सुरळीतपणे विज पुरवठा देत नाही तोपर्यंत एकही विज ग्राहक आपले विज बिल भरणार नाही.तसेच ग्रामपंचायतच्या नळ पाणी योजनेवरही परिणाम झाल्याने नळ पाणी योजनेचे ही वीज बिल भरणार नाही असा इशारा नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी दिला आहे. तसेच सर्व विज ग्राहक यांनी एक मुखी निर्णय घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता माळी , बगडे यांच्याशी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,असलदे माजी सरपंच तथा भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, विज ग्राहक संघटना कणकवलीच श्री कुलकर्णी, नांदगाव माजी सरपंच शशी तोरसकर,सोसायटी माजी चेअरमन रवींद्र तेली , व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे,प्रदीप हरमळकर, कमलेश पाटील, रघुनाथ लोके , प्रतिक भाट, रामचंद्र मोरये, विजय आचरेकर, आयनल माजी सरपंच बापू फाटक, संतोष वायंगणकर, राजू तांबे, योगेश सदडेकर, श्रीकृष्ण वायंगणकर आदी विज ग्राहक यांनी चर्चा केली आहे.





