कणकवलीत (प्रतिनिधी)
उबाठाला धक्क्यावर धक्के ; निवडणूकीच्या तोंडावर उबाठाच्या पदाधिकऱ्यांचा जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वारगावचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांचा भाजपात प्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. वारगाव येथील उबाठा सेनेचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी श्री. महेंद्र केसरकर यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आश्वासित केले.



