कणकवली दि २२ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
कणकवली विधानसभा मतदार संघाच्या वतीने राजन तेली, परशुराम उपरकर यांचा सत्कार
माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर कणकवली विधानसभा शिवसेनेच्या वतीने या
नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कणकवलीत भव्य सत्कार आज करण्यात आला.
कणकवली येथील भगवती मंगल कार्यालया ठिकाणी हा सत्कार झाला. यावेळी व्यासपीठाव जिल्हाप्रमुख , विधानसभा प्रमुख सतीश सावंत,सरपंच बंडू ठाकूर, राजू राठोड, माजी सभापती आबू पटेल,मिलिंद साटम, प्रसाद करंदीकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी,जयेश नर, यांच्यासह अन्य शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाषण करत असताना माजी आमदार राजन तेली यांनी आपापसात भांडू नका एकत्र व्हा व इच्छुकानी एकत्र येऊन लढा, असे सांगितले. तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एकत्र येऊन काम करा प्रसंगी मारा,झोडा मी तुमच्या सोबत आहे. अशी आक्रमक भूमिका घेत 1990 मधील शिवसैनिकाची भूमिका बोलून दाखवली.





