देवगड (स्वप्नील लोके)
इंग्रजी शब्द लेखन स्पर्धा संपन्न पडेल केंद्रबल गटाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
देवगड तालुक्यातील पडेल केंद्रबल गटांतर्गत समाविष्ट असलेल्या 14 शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शब्द लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पडेल केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख तथा तालुका समन्वयक श्री अशोक जाधव सर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिर्लोट आंबेरी येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी तिर्लोट आंबेरी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेश जुवाटकर, उपाध्यक्ष दिपाली आंबेरकर, शिक्षण तज्ञ चैतन्य आंबेरकर, अरविंद जुवाटकर , मुख्याध्यापक जॉर्ज फर्नाडिस व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांचे स्वागत करून श्री जाधव सर यांनी प्रास्ताविकात सर्वांना या नाविन्यपूर्ण इंग्रजी शब्द लेखन स्पर्धेची माहिती व उद्देश स्पष्ट केला. स्पर्धा प्रमुख म्हणून श्री विनायक पाटील, श्री. संभाजी जाधव, श्रीमती अश्विनी कुंभार, श्रीमती पवार यांनी कामकाज पार पाडले. चार गटात पार पडलेल्या या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
*गट क्रमांक एक* – इयत्ता पहिली, दुसरी-
*प्रथम* – आराध्य प्रशांत वारीक पडेल गावकरवाडी,
*द्वितीय* – तनिष्क अरविंद पाळेकर पडेल नंबर एक, *तृतीय*-सानवी अजय राऊत शाळा पडेल नंबर एक, *उत्तेजनार्थ*- परि सदानंद कामतेकर सौंदाळे बाऊळवाडी, *उत्तेजनार्थ*- युवराज केदार बाणे पडेल गावकरवाडी. *गट क्रमांक दोन*-इयत्ता तिसरी, चौथी- *प्रथम*-संस्कार समीर सावंत तिर्लोट मोहूळ, *द्वितीय*- शौर्य शेषेराव चव्हाण पडेल गावकरवाडी *तृतीय*-चैतन्य मधुसूदन काळे, पडेल नं. एक, *उत्तेजनार्थ*- अवनी हरिश्चंद्र कोठावळे कसबा वाघोटण, *उत्तेजनार्थ*- अनन्या नितीन जाधव तिर्लोट मोहूळ.. *गट क्रमांक तीन*-इयत्ता – पाचवी, सहावी- *प्रथम*- लावण्या विष्णू घाडी कसबा वाघोटण, *द्वितीय*- विघ्नेश हरिचंद्र जोशी- सडेवाघोटण, *तृतीय*- माही सदानंद कामतेकर सौंदाळे बाऊळवाडी, *उत्तेजनार्थ*-विधी दिनेश तेली कसबा वाघोटण, *उत्तेजनार्थ*-आस्था समीर गुरव सौंदाळे गावठाण, *गट क्रमांक चार*-इयत्ता सातवी, आठवी- *प्रथम*- प्रतिमा प्रमोद मिठबावकर सौंदाळे गावठण, *द्वितीय*-अनुष्का रामदास गुरव सौंदाळे बाऊळवाडी, *तृतीय*- प्रथम प्रमोद मिठबावकर सौंदाळे गावठाण, *उत्तेजनार्थ*- वृंदा किशोर घाडी, *उत्तेजनार्थ*-दिव्या सत्यवान पारकर तिर्लोट मराठी.
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेसाठी श्री सूर्यकांत साळुंके, श्री. श्रीधर सावंत, श्री गणेश सुतार, श्री महेश राठोड, श्री निवास शिंदे, श्री. डि. जी. भोसले व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे या शाळेने व शाळा व्यवस्थापन समितीने उपस्थित सर्व स्पर्धक मुलांसाठी व शिक्षकांसाठी सुंदर अशी भोजनाची व्यवस्था केली होती. सर्व विजेत्या मुलांना केंद्रांतर्गत होणाऱ्या विशेष समारंभात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.






