प्रवासी निवारा शेड तात्काळ मार्गी लावा!आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी!

118

 

देवगड -प्रतिनिधी

प्रवासी निवारा शेड तात्काळ मार्गी लावा!आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी !

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १३ सातपायरी देवगड इंग्लिश मीडियम स्कूल या नजीक आवश्यक असणारी प्रवासी निवारा शेड कामाची मागणी यापूर्वी संघटनेच्या व स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती .संबंधित विकास कामाकरता आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात येऊन या विकास कामांना मंजूर देण्यात आली. परंतु सदर मंजूर निधीचा वापर हे विकास काम अन्य विकास काम करता करण्यात येणार असल्याचे समजले. असून विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक असणारी प्रवासी निवारा शेड रद्द करण्यात न येता हे विकास काम तात्काळ मार्गी लावण्यात यावे व या विकास कामांचा निधी अन्य विकास कामाकरिता वळविण्यात येऊ नये अन्यथा संघटनेच्या वतीने स्थानिक नागरिक रहिवासी याच्या समवेत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर नाइलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलावा लागेल असे लेखी पत्र आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना सिंधुदुर्ग ,देवगड यांच्यावतीने देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले व त्याची प्रत नगराध्यक्ष साक्षी प्रभू आणि उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनाही सादर करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनील मेस्त्री, जिल्हा महिला कार्याध्यक्ष, दीपिका मेस्त्री,तालुका अध्यक्ष श्याम कदम, तालुका महिला अध्यक्ष शामल जोशी, जिल्हा मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले उपस्थित होते. या अनुषंगाने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करण्यात येऊन विद्यार्थी व नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असणारी ही प्रवासी निवारा शेड तात्काळ मार्गी लावण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.