देवगड (प्रतिनिधी) २८ऑगस्ट २०२४
आरे ग्रामपंचायत येथे उमेद अभियानाअंतर्गत लखपती दीदी कार्यक्रम संपन्न
देवगड तालुक्यातील आरे ग्रामपंचायत येथे उमेद अभियानांतर्गत लखपती दीदी हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी आरे गावातील सारिका फाळके, स्वरा कदम, वैभवी सावंत, शमिका लोके, दीपिका जेठे, पूजा कांबळे, सरिता तळवडेकर, वैभवी मालंडकर, प्रमिला मुणगेकर, सुषमा लाड या दहा महिला उद्योजिकांना (लखपती दीदी) मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.






