राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत देवगडच्या मुलांचे यश

7

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत देवगडच्या मुलांचे यश

 

देवगड (प्रतिनिधी) २३ऑगस्ट २०२४

 

पुणे आळंदी येथे झालेल्या ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आयडियल तायक्वांदो अकॅडमी व देवगड तालुका अमच्युअर तायक्वांदो असोशिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

यामध्ये सब ज्युनियर गट मुले- शातिस्वरुप गुरुनाथ प्रभू – सिल्व्हर मेडल, तृष्णात निखिल वानखेडे – ब्राँझ मेडल.

कॅडेट गट मुले – अभिराम विनायक नेने – गोल्ड मेडल, राज निखिल कोयघाडी – सिल्व्हर मेडल,सोमेश पंढरीनाथ मणचेकर – ब्राँझ मेडल.
ज्युनियर गट मुली – कावेरी प्रशांत हडकर- गोल्ड मेडल,
ज्ञानेश्वरी सतीश सकपाळ- गोल्ड मेडल, एमा संदिप कुलकर्णी – गोल्ड मेडल यांनी यश मिळविले.
वरील सर्व खेळाडूंना असोशीएशनचे अध्यक्ष विवेक नलावडे. सचिव तसेच प्रशिक्षिका शेवंता नाईक , सर्व पालक वर्ग यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.