सकारात्मक विचारांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

16

 

बांदा (मंगल कामत) ९ ऑगस्ट २०२४

 

    सकारात्मक विचारांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. – पालक मंत्री रविंद्र चव्हाण

 

बांद्यातील नागरिकांनी नेहमीच भाजपच्या विचारला साथ दिली आहे. आदर्श ग्रामपंचायत ही बांद्याची ओळख आहे. गावात टेलिमेडिसीन सुरु असल्याने इथल्या रुग्णांना मुंबई सारख्या नामांकित हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे. शहरासाठी अग्निशमन बंब लवकरच दिला जाईल. मच्छीमार्केटमध्ये स्वच्छता ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. बांदा शहरासाठी जे जे मागाल ते सर्व दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली.

    नागरी सुविधा योजने अंतर्गत बांदा आळवाडा येथे उभारलेल्या सुसज्ज मच्छी मार्केट इमारतीचा लोकार्पण सोहळा ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, माजी आ. राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती प्रमोद कामत, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी पं. स. सभापती शितल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतिब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविकास अधिकारी लीला मोर्ये आदी उपस्थित होते.

       ना. दीपक केसरकर म्हणाले,बांदा ही सावंतवाडी तालुक्याची आर्थिक राजधानी आहे. पालकमंत्री ना. चव्हाण यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी भरीव निधी दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. महायुतीला जिल्ह्यात सध्या चांगले वातावरण आहे. सर्वांनी एकत्रित येऊन विकासकामे करा. गैरसमजातून विरोध करू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मासे गोव्याला जातात. ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिल्यास बांद्यात सुमारे २ कोटी रुपये खर्च करून होलसेल मच्छीमार्केट उभारले जाईल. बांदा येथील प्रस्तावित क्रीडा संकुलसाठी ३ कोटी रुपये मंजूर केलेत. तेरेखोल नदीतील गाळ काढण्यासाठी मंत्री संजय बनसोडे यांनी मंजुरी दिली आहे. बांदा हे पर्यटन शहर करायचे आहे. बांद्यातून तेरेखोल नदीत पर्यटन दृष्टिकोनातून बोटी सुरु करण्याचा मानस आहे. रेडेघुमट, बांदा किल्ला या ऐतिहासिक वास्तू बांद्यात आहेत. शहराच्या प्रलंबित कामांसाठी भरीव निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, श्यामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, सौ. शिल्पा परब, सौ. रेश्मा सावंत, सौ. रुपाली शिरसाट, सौ. रिया येडवे, सौ. तनुजा वराडकर, सौ. दीपलक्ष्मी सावंत-पटेकर, सौ. देवल येडवे, माजी सरपंच बाळा आकेरकर, दीपक सावंत, गुरूदास धारगळकर, सिद्धेश पावसकर, सिद्धेश महाजन, कास सरपंच प्रवीण पंडित, डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, बांदा शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, सुशांत पांगम, राजेश विरनोडकर, भैय्या गोवेकर, पांडुरंग नाटेकर, दादू कविटकर, गुरु कल्याणकर, निलेश कदम, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, शैलेश केसरकर आदींसह परिसरातील भाजपा – शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच प्रियांका नाईक यांनी केले. सूत्रसंचलन रूपाली शिरसाट यांनी केले.

यावेळी स्थानिक शिक्षक भरती बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांची भेट घेऊन शिक्षक भरतीबाबत कैफियत मांडली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत १४३ उपशिक्षकाची पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील डीएड, टीईटी, सीटीईटी व टीएआयटी पात्रताधारक उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन ना. केसरकर यांनी दिले. यावेळी स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती अध्यक्ष विनय गायकवाड, उपाध्यक्ष निलेश तिर्लोटकर, सचिव पूजा सडवेलकर, अर्चना घावनळकर, मुग्धा पारकर, सुप्रिया पाटकर, निवेदिता कोळंबकर, प्रविण गोडकर, सिद्धी गोसावी आदी उपस्थित होते.