तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन होणार उपक्रमाची ५ ऑगस्टला सुरुवात

142

देवगड (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट २०२४

 

तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी
श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन होणार उपक्रमाची  ५ ऑगस्टला सुरुवात

 

कणकवली विधानसभा मतदारसंघातील २६३ गावांना उपक्रमाच्या माध्ममातून आमदार देणार भेटी

 

कणकवली मतदार संघाचे आमदार
श्री. नितेश राणे आपल्या तालुक्यातील कणकवली, देवगड वैभववाडी मतदार तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी हा जनसंपर्क मोहिम उपक्रम राबविणार आहेत.या उपक्रमाची सुरुवात सोमवार ५ ऑगस्ट पासून तीर्थक्षेत्र श्री देव कुणकेश्वर शंभुमहादेवाचे दर्शन घेऊन करणार आहेत.
सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारची पहिली पूजा पहाटे ५ वाजता आमदार नितेश राणे करणार आहेत. याचं दिवशी या जनसंपर्क मोहीम उपक्रमाची सुरुवात
कुणकेश्वर शिवतीर्थावर केली जाणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीतील विकास कामांचा लेखाजोखा या निमित्ताने जनतेसमोर मांडला जाणार असून, जनतेच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत.

या उपक्रमकालावधीत आमदार राणे तीन तालुक्यातील २६३ गावांना भेटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत.