कणकवली : राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांनी सलग पंधराव्या वर्षी शरद बंधारा बांधण्याची परंपरा जपली आहे. या बंधा-यामुळे कणकवलीसह जानवली मध्ये राहणा-या लोकांसाठी फायदा होणार आहे.
जानवली मधील नळ योजनेची विहिर नदीलगत असल्यामुळे विहिरिची पाण्याची पातली वाढते व जानवली गावाला पाण्याची टंचाई पाऊस पड़ेपर्यंत भासत नाही त्याचबरोबर कणकवली शहरातील विहिरिची पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे शहरातील पाणी तूटवडा भासत नाही त्याचबरोबर लोकांना जाण्या-येण्यासाठी या बंधाऱ्याचा खुप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. बंधाऱ्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतीला मुबलक पाणी मिळते ह्या सर्व गोष्टीमुळे लोकांची अबिद नाईक यांच्याकड़े बंधारा बांधण्याची मागणी असते व ही मागणी अबिद नाईक दरवर्षी पूर्ण करतात. त्याचबरोबर पक्का ब्रिज कम बंधारा होण्यासाठी शासन स्तरावर अबिद नाईक यांनी प्रयत्न केले आहेत, असे अबिद नाईक यांनी सांगितले.
त्यावेळी उपस्थित सर्व लोकांनी अबिद नाईक यांच्या समाज बांधिलकी व कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व नाईक यांचे आभार मानले. बंधारा बांधतेवेळी जानवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, ग्रामपंचायत सदयस्य दामोदर सावंत, रमेश राणे, नितिन राणे, अनुष्का राणे, दिशा राणे, सुवर्ना मेस्त्री, ग्रामस्थ दिपक दळवी उदय राणे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, शहर सरचिटणीस अनीस नाईक, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटनीस गणेश चौगुले, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, ग्रामस्थ उपस्थित होते.





