नांदगाव महावितरण कार्यालय येथे विज ग्राहक यांचा घेराव ; विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक.

24

 

कणकवली दि २९ जुलै ( तुळशीदास कुडतरकर)

 

नांदगाव महावितरण कार्यालय येथे विज ग्राहक यांचा घेराव ; विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक.

 

नांदगाव महावितरण कार्यालय येथे नांदगाव दशक्रोशीतील विज ग्राहकांचा वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित यामुळे संतप्त वीज ग्राहकांनी घेराव घातला
याबाबत गेल्या सोमवारी सुधारणा न झाल्यास आज 29 जुलै रोजी घेराव घालण्याचा इशारा नांदगाव दशक्रशीतील वीज ग्राहक संघटनेने दिला होता. विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला जात असून कार्यालय ठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवला आहे स्वतः पोलीस निरीक्षक श्री जगताप ही उपस्थित आहेत.

सरतेशेवटी प्रभारी कार्यकारी अभियंता श्री बगाडे यांनी तातडीने उपाययोजना करण्यात येईल ३० ऑगस्टपर्यंत सर्व प्रलंबित पूर्ण केली जातील. श्री गणेश चतुर्थीपूर्वी
विजेच्या समस्यांबाबत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.नांदगाव विज महावितरण कंपनीचे उप अभियंता श्री पंडित यावेळी उपस्थित होते.

सदर चर्चा करताना काही प्रमाणात बाचाबाची सुद्धा होत होती . मात्र सामाजिक पदाधिकारी त्या सर्वांनी पोलीस प्रशासन यांच्यामुळे सदर आंदोलनाला शांततेत पार पडले आहे.

आंदोलना मध्ये नांदगाव सरपंच भाई मोजकर , उपसरपंच इरफान साटविलकर,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,ओटव सरपंच रुहीता तांबे, ओटव उप सरपंच दुर्गेश ओटवकर ,बेळणे सरपंच अविनाश गिरकर ,तिवरे उपसरपंच वाळवे , तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच अशोक बोभाटे, नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर, ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर , व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे,प्रदीप हरमळकर,नांदगाव – बावशी पोलीस पाटील समिर मयेकर , अनिकेत तर्फे,इक्बाल बटवाले, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले, शकील बटवाले, कमलेश पाटील, राजू खोत, प्रफुल तोरसकर,रज्जाक बटवाले,अल्लाउद्दीन बोबडे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद माने, किरण मेथे , महिला पोलिस सुप्रिया भागवत,विनया सावंत आदी उपस्थित होते.