तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ प्रथमः मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

10

तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ प्रथमः मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

सावंतवाडी – प्रतिनिधी २९ जुलै २०२४

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक भाई मित्रमंडळ आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ वडखोल यांनी द्वितीय तर सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देखील जाहीर करण्यास आली असून, अनुक्रमे देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली व सद्गुरूनाथ प्रासादिक भजन मंडळ तुळस यांनी पटकावला आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून बुवा अमित तांबोळकर (स्वरधार प्रासादिक भजन मंडळ) यांना वयक्तिक बक्षीस जाहीर करण्यास आले आहे. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम समीर नाईक (स्वराभिषेक मणेरी), उत्कृष्ट पखवाज वादक सचिन पांगम (सनामदेव सांगेली), उत्कृष्ट तबला वादक ओंकार तळवणेकर (सनामदेव सांगेली), उत्कृष्ट तालरक्षक शेखर दळवी (विघ्नहर्ता प्रासादिक भजन मंडळ न्हावेली) यांना जाहीर करण्यात आला आहे. तर स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त यांना जाहीर करण्यास आले आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री योगेश प्रभू, श्री मोहन मेस्त्री, श्री राजेश यांनी काम पाहिले.