जूनमधील धान्य वितरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ ; शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या भेटीत मंत्री छगन भुजबळांची ग्वाही

20

 

कणकवली दि. ५जुलै (तुळशीदास कुडतरकर)

जूनमधील धान्य वितरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ ; शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या भेटीत मंत्री छगन भुजबळांची ग्वाही

 

जून महिन्यातील धान्य २२ जून नंतर रेशन दुकानदारांना पोच करण्यात आले. त्यामुळे ३० जून पर्यंत धान्य लोकांना वितरीत करता आले नाही. लोकांची शेतीचे कामे सर्व्हर प्राब्लेम या कारणामुळे रेशनधान्य अद्यापही लोकांपर्यंत पोहचलेले नाही. तरी जून २०२४ मधील धान्य जुलै २०२४ मध्ये वितरीत करण्यातसाठी मुदतवाढ मिळावी. अशा मागणीचे निवेदन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन दिले. त्यावर मंत्र्यांनी १५ दिवसांची मुदतवाढ तात्काळ देत असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा शिवसेनेचे समन्वयक सुनील पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, अभिनंदन मालंडकर उपस्थित होते.