कृषी दिनी नांदगाव येथे शंभर रोपांचे वृक्षारोपण

9

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)४ जुलै २०२४

कृषी दिनी नांदगाव येथे शंभर रोपांचे वृक्षारोपण

 

कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय ,फोंडाघाट येथील येथील कृषीच्या अंतिम वर्षाच्या कृषिदुतांकडून ग्रामिण कृषी जागरूकता आणी कृषी औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत नांदगांव मध्ये कृषी दिवस आणि कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्ष दिंडी , वृक्ष रोपण यासारखे उपक्रम राबवण्यात आले. वृक्षारोपण चे महत्व,ते का गरजेचे आहे?, आधुनिक युगामध्ये वृक्षांची संगोपन आणि लागवड यासंबंधी माहिती दिली.तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व उपस्थित शिक्षकवर्ग यांच्यासह वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच नांदगांव गावचे सरपंच श्री रविराज धोंडू मोरजकर , उपसरपंच श्री इरफान अब्दुलगफुर साटविलकर यांच्या सहयोगाने शंभर रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत श्री.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली आणि श्री.वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्रासाठी चे योगदान पटवून देण्यासाठी त्यांची माहिती त्यांना सांगण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच श्री रविराज धोंडू मोरजकर , उपसरपंच श्री इरफान अब्दुलगफुर साटविलकर व जि.प.पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षकवर्ग यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामध्ये कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट चे कृषीदूत रणजीत डोंबाळे, रितेश मोरे, सौरभ पाटील, गणेश भोसले, पांडुरंग मिसाळ, सौरभ पिसे, प्रज्ञेश लळित, ऋषिकेश जाधव, बालाशिवा, शिवानागेंद्र या विद्यार्थ्यांचा सहभाग होत