उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आता तालुक्यातील विविध महा-ई सेवा केंद्रावर सुविधा उपलब्ध –तहसीलदार दीक्षांत देशपांडे
कणकवली दि २ जुलै (तुळशीदास कुडतरकर)
कणकवली तहसील कार्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी लाभार्थ्यांना गावपातळी वर उत्पन्नाचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक सजेत तलाठ्यांना नोंद घालून पंचनामा करून त्याच्यावर उत्पन्नाची नोंद घालावी असे आदेश दिले आहेत. तसेच सर्व तलाठ्यानी उशिरापर्यंत आपल्या सजेच्या मुख्यालयी थांबण्याच्या सूचना देखील श्री देशपांडे यांनी दिल्या आहेत. तसेच गावाच्या जवळील असणाऱ्या महा- ई-सेवा केंद्रांमध्ये हे उत्पन्नाच्या दाखल्या साठीचे अर्ज लाभार्थ्यांनी जमा करावेत जेणेकरून लाभार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना दाखले देखील तत्परतेने उपलब्ध होतील असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. अशी माहिती श्री देशपांडे यांनी दिली.
त्यामळे खालील टिलेल्या आपल्या गावातील किंवा नजीकच्या
महा-ई-सेवा केंद्रांवर आपण जाऊन आपला उत्पन्न दाखला काढता येणार आहे.
महा-ई-सेवा केंद्र
खारेपाटन- भूषण कांबळे 9209637292
तरळे – गौरी माळवदे 7888171017
साक्षी सुर्वे 9834915672
नांदगाव – रामचंद्र लोके-9730308057,
फोंडाघाट- गणेश तेली-9420154648
तरंदळे- विवेक सावंत-7507458720
ओसगाव – प्रवीण नाईक-9823400472
सांगवे – मंगेश कुलकर्णी-9421975145,
नरडवे -लक्ष्मण ढवळे 9405331719 वागदे- गणेश पारकर 9561481418
कणकवली सुप्रिया बिडये-7350234366
कणकवली मंगेश सावंत-9421267162
या वरील महा-ई-सेवा केंद्रांवर आपण उत्पन्न दाखला अर्ज घेऊन तलाठ्याकडे आपल्या उत्पन्नाची नोंद करावी व पुन्हा अर्ज त्याच महा ई सेवा केंद्र मध्ये जमा करावेत अशा सूचना तहसीलदार देशपांडे यांनी दिल्या आहेत. यासोबत वय अधिवास दाखल्यासाठी अनेक अर्ज धारकांना जन्म दाखला नसल्याची अडचण भासत होती. मात्र ही अडचण आता दूर होणार असून जन्म दाखला नसल्यास त्या ऐवजी शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत या अर्जासोबत जोडल्यास ती देखील चालणार असल्याचे श्री देशपांडे यांनी सांगितले. किंवा
हे दोन्ही कागदपत्र नसल्यास पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचा अन्य पुरावा जोडल्यास तो देखील चालणार असल्याचे श्री देशपांडे यांनी सांगितले.





