2 दिवसांत पी एम किसान योजनेचे दोन वर्षे वंचीत राहिलेले अनुदान मिळवून देणार – नायब तहसीलदार यांचे आश्वासन 

8

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)१ जुलै २०२४

2 दिवसांत पी एम किसान योजनेचे दोन वर्षे वंचीत राहिलेले अनुदान मिळवून देणार – नायब तहसीलदार यांचे आश्वासन 

आश्वासनानंतर पिंगुळी येथील शेतकऱ्यांचे उपोषण‌ तूर्तास स्थगित

 

 

पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान गेली दोन वर्षे बंद झाल्याने पिंगुळी धुरी टेंबनगर येथील शेतकऱ्यांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर 1 जुलै कृषी दिनाचे औचित्य साधत लाभार्थ्यांनी बेमुदत उपोषण केले.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू धुरी, ग्रामपंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, मंगेश चव्हाण, संकेत धुरी, पुरुषोत्तम धुरी, चंद्रकांत धुरी, संदीप वारंग,गुरुनाथ पिंगुळकर,रविकांत धुरी, भास्कर तळवणेकर,प्रकाश पिंगुळकर, प्रकाश मिशाळ, गुरुनाथ मेस्त्री,अनंत धुरी अन्य लाभार्थी उपस्थित होते.

या शेतकऱ्यांच्या उपोषणाला नायब तहसीलदार श्री. करंदीकर आणि श्री. गवस यांनी भेट देवून येत्या 2 दिवसांत पी एम किसान योजनेचे दोन वर्षे वंचीत राहिलेले अनुदान मिळवून देणार असल्याचे आश्वासनानंतर शेतकऱ्यांना दिले असल्याने तूर्तास हे उपोषण स्थगित करण्यात आले.