निरंजन डावखरे यांना पदवीधरांचे प्रश्न सोडवता आले नाहीत – युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची टीका

25

कणकवली (तुळशीदास कुडतरकर) २५ जून २०२४

निरंजन डावखरे यांना पदवीधरांचे प्रश्न सोडवता आले नाहीत – युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची टीका

 

पदवीधर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना फोंडाघाट येथे चांगला प्रतिसाद
महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार श्री. रमेश किर यांचा न्यु ईंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे प्रचार करताना काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष श्री.सुशांत नाईक, शिवसेना विभाग प्रमुख राजु रावराणे, मुख्याध्यापक श्री. रासम सर, प्रसाद पारकर ,संतोष टक्के, प्रदीप कुमार जाधव ,व स्टाफ उपस्थित होते.
तळकोकणात या निमित्ताने उमेदवारीची प्रथमच संधी या निमित्ताने लाभली आहे. या पूर्वीचे आमदार निरंजन डावखरे यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण त्यांना पदवीधरांचे प्रश्न सोडवता आले नाहीत .त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीची लाट आहे. श्री रमेश किर हे शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात चांगले काम आहे. त्यामुळे की त्यांच्यासारखा उमेदवार च पदवीधरांचे प्रश्न सोडवू शकतो .त्यामुळे त्यांना पहील्या पसतीचे 1 नंबर लिहून विजयी करा असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले.