प्रज्योती पुस्तक पेढी, जोगेश्वरी संस्थे मार्फत शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडावच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

70

कणकवली ( तुळशीदास कुडतरकर) २५ जून २०२४

प्रज्योती पुस्तक पेढी, जोगेश्वरी संस्थे मार्फत शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडावच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या विद्यालयामध्ये प्रज्योती पुस्तक पेढी, जोगेश्वरी, संस्थेच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्या आणि 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनीना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
या वेळी प्रज्योती पुस्तक पेढीचे पदाधिकारी राजेश सावंत यांनी कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशाने संस्था अशा सेवा भावी उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले..
या वेळी प्रज्योती पुस्तक पेढीचे श्री. राजेश सावंत,श्री गणेश दळवी, श्री कुसगावकर. श्रीमती. दळवी मॅडम, शालेय समिती अध्यक्षा, श्री. मसवेकर, माजी मुख्याध्यापक शिवडाव विद्यालय. मुख्याध्यापक श्री. पवार. तसेच विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्री.श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष श्री मोहन पाताडे, कार्यवाह श्री काशीराम गावकर तसेच शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीम. भाग्यरेखा दळवी, खजिनदार श्री विद्याधर गावकर, सदस्य आर्किटेक्ट श्री. गणेश म्हसकर, सदस्य तथा प्रा.श्री. विजय सावंत यांनी प्रज्योती पुस्तक पेढी या संस्थेचे आभार मानले .