मुंबई : ईटीच्या अहवालानुसार, डीटीएच ऑपरेटर ब्रॉडकास्टरने वाढवलेल्या किंमतीचा भार हा ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. डीटीएचचे दर एकाच वेळी नाही तर टप्प्याटप्प्याने वाढविले जाणार आहेत. एकाच वेळी किंमत वाढल्याने ग्राहक नाराज होऊ शकतात. ग्राहकांच्या रिचार्जमध्ये २५ ते ५० रुपयांची वाढ होणार आहे.
टीव्ही सबस्क्रिप्शनसाठी प्रति वापरकर्ता किंवा ARPU सरासरी कमाई २२३ रुपये आहे. टाटा प्लेने ४ ते ६ आठवड्यांत टेरिफ वाढीची घोषणा केली जाणार आहे. ही दरवाढ ५ ते ६ टक्के असू शकते. डीटीएच ऑपरेटर नेटवर्क क्षमता शुल्क किंवा एनसीएफ वाढवत नाहीत. यामुळे एवढी कमी वाढ होणार आहे. ओव्हर-द-टॉप किंवा ओटीटीचे प्रस्थ खूप वेगाने वाढत आहे. डीटीएचचे दर जर वाढले तर ग्राहक ओटीटींकडे वळण्याची शक्यता आहे.





