सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील इ.5वी साठी 44 केंद्र व इ.8वी साठी 29 केंद्र असे एकुण 73 केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
परीक्षेसाठी इ.५ वी साठी ३ हजार ७९९ विद्यार्थी व इ. ८ वी साठी २ हजार १९२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र (हॉलतिकीट) परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे. या परीक्षा दि. १२ फेब्रुवारी रोजी पेपर क्रमांक -१ सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजता होईल. व पेपर क्रमांक -२ दुपारी २ ते ३.३० वाजता होईल अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. याबाबतची नोंद सर्व पालक, विद्यार्थी यांनी घ्यावयाची असून, कोणतीही शंका असल्यास जवळच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय तसेच केंद्रशाळामध्ये संपर्क करावा.
विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी किमान ३० मिनीट अगोदर उपस्थित राहावे. सर्व विद्यार्थींना या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्यावतीने हार्दिक शुभेच्छा! देण्यात आल्या आहेत.





