तळवडे न्हावनकोंड धबधबा येथे दोन गटात राडा ; घटनेनंतर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन सतर्क

516

तळवडे न्हावनकोंड धबधबा येथे दोन गटात राडा ; घटनेनंतर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन सतर्क

बुधवार शुक्रवार शनिवार रविवार अन्य सुट्टीच्या दिवशी असणार पोलीस बंदोबस्त

देवगड (प्रतिनिधी)दि २४ जून २०२४

देवगड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या तळवडे येथील
न्हावनकोंड धबधब्यावर पावसाळी पर्यटनाच्या पहिल्याच शनिवारी जोरदार हाणामारी झाली मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तालुक्यातील दोन गावातील युवकांचा मुख्य प्रवाही धबधब्याच्या ठिकाणी जोरदार राडा झाला. यावेळी 60 ते 70 पर्यटकही या ठिकाणी अशा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी दोन गावातील युवकांच्या झालेल्या राड्यातील वाद ग्रामस्थांनी मिटविण्याचा प्रयत्न केला.परंतु मध्यधुंद अवस्थेतील हे युवक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, गेल्यावर्षी सुद्धा अशाच प्रकारामुळे गावातील ग्रामस्थांच्या नाहक त्रास सहन करावा लागला होता. अशा घटनांमुळे तळवडे गावातील शांतता धोक्यात येत आहे.
दरम्यान शनिवारी झालेल्या या घटनेची कोणतीही तक्रार देवगड पोलीस स्टेशनला नव्हती. मात्र या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देवगड तालुक्यात रंगली होती. या घटनेनंतर तळवडे ग्रामपंचायतिच्या झालेल्या मासिक सभेत न्हावनकोंड धबधबा या ठिकाणी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता. व अशा घटना टाळण्यासाठी व अशा घटनांना आळा बसण्यासाठी बुधवार शुक्रवार शनिवार रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायत या ठिकाणी आपले कर्मचारी नेमणार आहेत. तसेच पोलीस पाटीलही तेथे उपस्थित असणार अशी माहिती ग्रामपंचायतच्या वतीने कळविण्यात आली. तर देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत या ठिकाणी बुधवार शुक्रवार शनिवार रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी दोन पोलीस तैनात करणार असून आपण स्वतः देखील या ठिकाणी गस्त घालणार असल्याचे पोलीस निरीक्षक देवकर यांनी सांगितले.