कुणकेश्वर समुद्रकिनारी ३०० सुरुंच्या रोपाची लागवड

345

कुणकेश्वर समुद्रकिनारी ३०० सुरुंच्या रोपाची लागवड

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या संयुक्त उपक्रम

देवगड (प्रतिनिधी) १९ जून २०२४
पुरोगामी महाराष्ट्र शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानेच्या वतीने कुणकेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले. कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने या सुरूच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता कुणकेश्वर बीच येथे करण्यात आला.
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने वाढती ग्लोबल वार्मिंगची समस्या लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात जगप्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्रकिनारी वृक्षारोपण करून करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३०० झाडे लावण्यात आली. यामध्ये सुरु, वड व पिंपळ अशा झाडांचा समावेश आहेत.
oplus_131074
oplus_131074
या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष  सचिन जाधव, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, अभिजीत मदने, कुणकेश्वर ग्रामसेवक गुणवंत पाटील, केंद्रप्रमुख तथा जिल्हा नेते अशोक जाधव, स्नेहा पारकर, आनंद जाधव, संगीता जाधव, प्रकाश वाडकर खराडे, धर्मराज धुरत, मधुसूदन घोडे, देवीदास माने,उपसरपंच शशिकांत लब्दे, ग्रा प सदस्य ,संजय आचरेकर, एकनाथ तेली,डॉ मांडवकर, महेश तेली, भास्कर पेडणेकर, सुजित बोंडाळे, विलास लोके,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी,पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.
oplus_131074
oplus_131106