दीक्षित फाउंडेशनच्या शैक्षणिक विचार मंचाची स्थापना…..

53

देवगड प्रतिनिधी

दीक्षित फाउंडेशनच्या शैक्षणिक विचार मंचाची स्थापना…..

निळकंठ श्रीधर उर्फ स्व. बाळासाहेब दीक्षित व स्व.श्रीमती नीता निळकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच देवगडच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात होणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्याकरिता देवगड तालुक्यातील समविचारी मुख्याध्यापक यांच्या शैक्षणिक विचार शिक्षक मंच ची स्थापना करण्यात आली असून या मंचाच्या माध्यमातून विविध उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आणि याकरिता शैक्षणिक विचारमंचाची स्थापना करून पदाधिकारी जाहीर करण्यात आली. यात संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित सौ मंजिरी दीक्षित, अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण माने,: सचिव मुख्याध्यापक माधव यादव कुणकेश्वर, समन्वयक मुख्याध्यापक हिराचंद तानवडे पडेल हायस्कूल,सदस्य शमशुद्दीन अत्तार मुख्याध्यापक शिरगाव महादेव घोलराखे मुख्याध्यापक देवगड हायस्कूल, गणेश रानडे मुख्याध्यापक सौंदाळे हायस्कूल ,संजय गोगटे मुख्याध्यापक जामसंडे हायस्कूल महिला सदस्य आसावरी कदम मोंड हायस्कूल,सुरेश देवळेकर यांचा समावेश आहे.
या शैक्षणिक विचार मंचाच्या वतीने संपूर्ण वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात ७ जुलै स्व.बाळासाहेब दीक्षित जन्मदिवस सामाजिक सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून यात ई.११वी मध्ये प्रवेश घेतलेल्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांना रोख रुपये ३०००/- स्कॉलरशिप देवगड तालुक्यातील ११ महाविद्यालयातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना अशी एकूण २२ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे .
२५ ऑगस्ट स्व.बाळासाहेब दीक्षित पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील माध्यमिक विद्यार्थी करिता विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढावी याकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन इयत्ता ६ ते ८ इयत्ता ९ ते १०अशा दोन गटात करण्यात आले आहे.
यातील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे .
१६ जानेवारी स्व. नीता दीक्षित जन्मदिवस यानिमित्त तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील प्रत्येक मुलांकरिता रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांच्या सहभाग होणार असून इयत्ता १ ते ४ इयत्ता ५ते७ इयत्ता८ ते १० अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. दिनांक १२ मे स्व.नीता दीक्षित यांचा पुण्यतिथी दिन यानिमित्त तालुकास्तरीय मुले व मुली खो-खो स्पर्धेचे आयोजन सोळा वर्षाखालील माध्यमिक गटात नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रत्येकी एक आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेच्या पूर्वी विद्यार्थ्यांना व चित्रकला शिक्षकांना विशेष चित्रकला स्पर्धा मार्गदर्शन तसेच करिअर गार्डन विषयी मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित आणि समन्वयक हिराचंद तानवडे यांनी दिली.