आमदार नितेश राणे आज देवगड दौऱ्यावर ; कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठक
देवगड (प्रतिनिधी)
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उद्या सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी आमदार नितेश राणे साहेब कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील पडेल,देवगड आणि शिरगाव या तीनही ठिकाणी आढावा बैठक घेणार आहेत. या आढावा बैठकांची वेळ व ठिकाण दुपारी १२.०० वा.पडेल – पडेल कॅन्टीन पक्ष कार्यालय दुपारी १.०० वा.देवगड – देवगड पक्ष कार्यालय. दुपारी २:३० वा.शिरगाव – लोके मंगल कार्यालय,शिरगाव. तरी या बैठकीस सर्व पदाधिकारी आणि मतदार यांनी वेळेत उपस्थित रहावे.