शाळांची घंटा वाजली ; देवगड तालुक्यात २०७ शाळांमध्ये नवगतांचे स्वागत

121

शाळांची घंटा वाजली ; देवगड तालुक्यात २०७ शाळांमध्ये नवगतांचे स्वागत

पहिली मध्ये ७५१ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) दि.१५ जून २०२४

मे महिन्याची सुट्टी संपली आणि शनिवारपासून शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. देवगड तालुक्यातील २०७ शाळांमध्ये नवगतांचे स्वागत औक्षण करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. पहिली मध्ये ७५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला अशी माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी दिली.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष शनिवार दिनांक १५ जून पासून सुरू झाले, आणि शाळांची घंटा वाजली. शाळेमध्ये नव्याने दाखल झालेल्या नवगतांचे स्वागत विविध उपक्रमांनी शाळांमध्ये करण्यात आली. प्रभात फेरी काढून वाजत गाजत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन औक्षण करत, तर काही ठिकाणी शाळांमध्ये रोपवाटप करून स्वागत करण्यात आले, पहिल्या दिवशी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत मुलांना पोषण आहार देण्यात आला.अशी माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी दिली. २०७ शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देखील वितरण देखील करण्यात आले.