सावंतवाडी (प्रतिनिधी)दि. १५ जून २०२४
मळेवाड गावात कृषीदुतांचे स्वागत……
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत मळेवाड गावामध्ये कृषीदुत यांचे स्वागत करण्यात आले.
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत मळेवाड गावामध्ये महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी अभ्यास व सर्वेक्षण करण्यासाठी दाखल झालं आहेत.या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयात जाऊन सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांची भेट घेतली.यावेळी विद्यार्थ्यांचे झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.सदर विद्यार्थी जुन ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत.गावात राहून गावची शेतीविषयक कार्यपद्धती, विविध संस्था,शाळा,शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. सदर गटामध्ये अंकित गावणकर , संचित तांबट , अल्पेश वाळके , ध्रुव मालडीकर ,अभी अनप , शशांक साळुंखे, प्रदीप चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्याना उपसरपंच यांनी गावाची भौगोलिक परिस्थिती,गावातील प्रमुख पिके,गावातील प्रगत शेतकरी या संदर्भात माहिती दिली.तर सरपंच सौ मिलन पार्सेकर यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.





