कणकवली : कनेडी येथे झालेल्या भाजप – शिवसेना पक्षाचा कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरणी दोन्ही पक्षाच्या १० कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर आम. वैभव नाईक, सतीश सावंत, सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांना अटक होण्याची शक्यता आहे.


दरम्यान आयपीसी ३०७ मधील दोन्ही गुन्ह्यातील एकूण ६ तर आयपीसी ३५३ मधील ४ आरोपींना कणकवली पोलिसांनी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास अटक केली.
सदर अटकेच्या कारवाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंगेश रामचंद्र सावंत (वय ४८,भिरंवडे ), कृणाल विजय सावंत ( वय -३४, रा.सांगवे), योगेश रमाकांत वाळके ( वय ४२, रा.कनेडी), श्रीकांत नारायण सावंत ( वय ५०,भिरंवडे ), राजेश मधुकर पवार ( वय ५१,दिगवळे ) या पाच आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
तर भाजपच्या निखिल प्रकाश आचरेकर ( वय ३९, रा. मारुती आळी,कणकवली ), अनिल राजाराम पांगम ( वय ५८, सांगवे), संतोष वसंत आग्रे ( वय ४९, फोडांघाट ), संदीप बाळकृष्ण गावकर ( वय ३२, सांगवे ), तुषार श्यामसुंदर गावकर ( वय २९, सांगवे ) या पाच जणांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सागर खंडागळे, पीएसआय वृषाली बर्गे यांच्या नेतृत्वाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली.





