वैभव नाईक यांची ही शेवटची आमदारकी असल्याने त्यांनी ती एन्जॉय करावी -माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

8

वैभव नाईक यांची ही शेवटची आमदारकी असल्याने त्यांनी ती एन्जॉय करावी -माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

 

कणकवली( प्रतिनिधी)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंना मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणकीत वैभव नाईक यांचा दारुण पराभव होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या नाईक बंधूंच्या राऊतांच्या पराभवानंतर पत्रकार परिषदा बंद झाल्या आहेत. असा टोला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.वैभव नाईक यांची ही शेवटची आमदारकी असल्याने त्यांनी ती एन्जॉय करावी.असा टोला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.

भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, अभय राणे, शिशीर परुळेकर, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, संजना सदडेकर, साक्षी वाळके आदी उपस्थित होते.

यावेळी नलावडे म्हणाले की,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही उमेदवाराला शहरातून फारसे लीड मिळाले नव्हते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना 1717 एवढे एतिहासिक लीड मिळाले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकास झाल्याने शहरातील मतदारांनी राणेंना मताधिक्य दिले. याबद्दल शहरवासीय व माजी नगरसेवक, भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आभार मानले.

वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांच्या पराभवासाठीच काम केले, असा गंभीर आरोप नलावडे यांनी केला.विनायक राऊत यांच्या पराभव झाल्यानंतर नाईक बंधूंच्या पत्रकार परिषदाही बंद झाल्या आहेत, असा टोला नलावडे यांनी लगावला.

नलावडे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना शहरातून लीड देण्याचा निर्धार शहरातील माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला होता. याकरिता शहरात त्यांनी राणेंचा जोरदार प्रचार केला. 4 जूनला जाहीर झालेल्या निकालात राणे हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले.

तत्कालीन केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांत कणकवली शहराच्या विकासासठी कोट्यवधींचा निधी मिळाला. या निधीमुळे शहरातील विकासांची कामे मार्गी लागली. याची पोचपावती म्हणून शहरातील मतदारांनी राणेंना मताधिक्य दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकासकामे मार्गी लावली. याबाबत मी आभार मानतो. राणेंच्या विजयासाठी माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच राणेंना शहरातील बूथवर मताधिक्य मिळाले, असे नलावडे यांनी सांगितले.