कणकवली (तुळशीदास कुडतरकर)१२ जून २०२४
हळवल शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या कॉजवेचे काम ग्रामस्थांनी रोखले
सुरू असलेले काम देखील नित्कृष्ठ असल्याचा ठपका
कणकवली (प्रतिनिधी)
तालुक्यातील हळवल गावातील शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या कॉजवेचे काम येथील ग्रामस्थांनी रोखले आहे. सध्या हळवल शिवराई मंदिराजवळ जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कॉजवेचे काम सुरु आहे. मात्र सदर काम नित्कृष्ट दर्जाचे आल्याचा ठपका ठेवत हळवल येथील ग्रामस्थानी काम बंद पाडले.
जिल्हापरिषदच्या जिल्हा वार्षिक निधीतून तब्बल ४३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कॉजवेच्या कामाची ऑर्डर आचार संहितेपूर्वी काढण्यात आली होती. मात्र सदर ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांचा येण्या – जाण्याचा मार्ग बंद झाला. मात्र तात्पुरता पर्यायी रस्ता काढून ग्रामस्थांचा मार्ग खुला करण्यात आला होता. परंतु मागील दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे पर्यायी मार्गांवर पाणी साचून चिखल झाला. येण्याजाण्याचा मार्ग व्यवस्थित असल्याने येथून चालणे देखील मुश्किलीचे झाले होते. तसेच सदर कॉजवेचे काम देखील चुकीच्या पद्धतीने व नित्कृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला. दरम्यान येथील देखील त्याचवेळी काम बंद पाडले.





