ज्यांच्या गावात वीज खंडित होती त्यांनी माझ्यावर टीका करू नये – राजन तेली

161

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

ज्यांच्या गावात वीज खंडित होती त्यांनी माझ्यावर टीका करू नये – राजन तेली

सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली होती.या बैठकीला माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.यावर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपले मत व्यक्त करत असताना विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक नेते सक्षम असल्याचे सांगत बाहेरच्या लोकांनी लुडबुड करू नये अशी टीका राजन तेली यांचे नाव न घेता चिमटा काढला.
याबाबत राजन तेली याना विचारले असता मी जनतेच्या प्रश्नासाठी गेलो होतो असे सांगत जे माझ्यावर टीका करतात त्यांच्याच गावात वीज पुरवठा खंडित होता हे तरी त्याना माहीत आहे का?असा प्रति सवाल करत संजू परब हे माझे मित्र आहेत त्यामुळे अधिक बोलणं टाळलं.जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागावी असे मत व्यक्त केले.