आरोस नागोजीवाडी येथील युवकाची पुणे येथे गळफास लावून आत्महत्या
सावंतवाडी (प्रतिनिधी) १जून २०२४
सावंतवाडी तालुक्यातील आरोस नागोजीवाडी येथील हा सदरचा युवक असून नोकरी निमित्त पुणे येथे राहत होता.पुणे येथे आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेले नाही.सदरचा युवक हा अविवाहित होता.या युवकाच्या पश्चात आई,भाऊ असा परिवार आहे.