दहावी बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना लागणारेशासकीय दाखले तात्काळ उपलब्ध होण्यासाठी तालुका युवासेना घेणार पुढाकार – गणेश गावकर

141
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1,"remove_bg":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

देवगड (प्रतिनिधी)२७ मे २०२४

दहावी बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना लागणारे शासकीय दाखले तात्काळ उपलब्ध होण्यासाठी तालुका युवासेना घेणार पुढाकार – गणेश गावकर

 

बारावी व दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर मध्ये उत्तीर्ण झालेल्या देवगड तालुक्यातील अनेक भागांमधील विद्यार्थ्यांना शासकीय स्तरावरील दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. हे दाखले विद्यार्थ्यांना तात्काळ मिळावेत या करिता युवासेना देवगड तालुका पुढाकार घेणार असून देवगड तालुक्यातील युवासेने मार्फत विद्यार्थ्यांना सहज व लवकर दाखले मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे देवगड तालुक्यातील बारावी उत्तीर्ण झालेल्या व दहावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या दाखल्यांकरिता युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर यांनी केले आहे. युवा सेनेमार्फत देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता तहसीलदार कार्यालय येथे आवश्यक ती मदत केली जाणार असून, जेणेकरून या विद्यार्थ्यांना दाखले सहज सोपे मिळावेत व याला कोणती अडचण निर्माण येऊ नये यासाठी युवासेना हा सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती तालुका प्रमुख गणेश गांवकर यांनी दिली. कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्याना जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, वय आधीवास, उत्पन्न दाखला यासह अन्य दाखले तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. व याकरिता विद्यार्थ्यांनी गणेश गांवकर९७७३२७२३३८, व तुषार धुरी ८२७५३०९०८१/९३०७१६३७८१या दिलेल्या नंबर वर संपर्क साधा. असे श्री गांवकर यांनी सांगितले.