बांदा (मंगल कामत)२७ मे २०२४
विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा
मंगळवारी २८ मे रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात ‘अर्चाशुद्धी हवनद्वारा नवचंडी’ हा धार्मिक सोहळा होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता गणपती पूजन, प्रायश्चीत विधी व देवतांना नारळ व विडे ठेवणे, पुण्याहवाचन, देवता होमहवन, कुंकूमार्चंन, बलिदान, पूर्णाहुती, आरती, महानैवैद्य, महाआरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजल्यापासून ग्रामस्थांची भजने, रात्री १० वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ (म्हापण) यांचा ‘पंढरीचा पहिला वारकरी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी माऊली पंचायतनचे प्रमुख मानकरी, मर्यादा आणि श्रीदेवी माऊली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांनी केले आहे. तसेच कुंकूमार्चन सोहळ्यासाठी महिलांनी आपली नावे देवस्थान कमिटीकडे नोंदवावी.





