जलजीवनची ७० टक्के कामे राणे समर्थक ठेकेदाराकडे ; मुदत संपली तरीही कामे अर्धवट स्थितीत यामुळे पाणी प्रश्न गंभीर – सुशांत नाईक

302

जलजीवनची ७० टक्के कामे राणे समर्थक ठेकेदाराकडे ; मुदत संपली तरीही कामे अर्धवट स्थितीत यामुळे पाणी प्रश्न गंभीर

आरोग्य आणि प्राणी प्रश्नाला स्थानिक आमदार जबाबदार; युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा गंभीर आरोप

देवगड प्रतिनिधी

जलजीवनची ७०% कामे राणे समर्थक एकाच ठेकेदाराकडे असून ती मुदत संपली तरी अर्धवट स्थितीत आहेत. यामुळे देवगड सह पूर्ण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. एकीकडे पाण्याचा गंभीर प्रश्न तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयात पंधरा वर्षापासूनचीच व्यवस्था आहे. चांगल्या यंत्रणेची कमतरता आहे याला जबाबदार सत्ताधारी भाजपा आमदार आहेत असा आरोप युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. तर ग्रामीण रुग्णालयाला चांगली यंत्रणांना दिल्यास व जलजीवनची कामे अपूर्ण अवस्थेत ठेवून जनतेचा पाणी प्रश्न ताटकळत ठेवणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारणार असा इशारा ही नाईक यांनी दिला.

उबाठा शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालय आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर ,उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे ,गणेश वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू घाडी, नगरसेवक बुवा तारी, माजी नगरसेवक विकास कोयंडे आदी उपस्थित होते.

देवगड ग्रामीण रुग्णालयात इळये प्रसूती झालेल्या महिलेच्या अति रक्तस्त्रावाने उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. व नाडण येथील नवजात दोन दिवसाचा बालकाचा मृत्यू झाला याबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेतल्यानंतर चांगली यंत्रणा नसल्यामुळे रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट होत आहे. जी यंत्रणा आवश्यक आहे त्या यंत्रणेची कमतरता आहे. वैद्यकीय अधिकारी संख्या कमी असतानाही सद्यस्थितीत असलेले डॉक्टर चांगले सेवा देत आहेत. मात्र त्यांना आवश्यक असलेल्या चांगल्या यंत्रणेची कमतरता असल्याने चांगली सेवा देणे अशक्य होत आहे. चांगली यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे येथील प्रसूती झालेल्या महिलेच्या अति रक्तस्त्रामुळे तर नाडन येथील नवजात दोन दिवसीय बालकाच्या शुगर कमी झाल्याने मृत्यू झाला असे असले तरी या रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. आरोग्याबरोबरचं पाणी प्रश्न गंभीर झाला आहे देवगडसह विजयदुर्ग भागात भीषण पाणीटंचाई आहे. काहीजण टॅंकरने पाणीपुरवठा करीत आहेत. या तालुक्यात जलजीवनची ७० टक्के कामे राणे समर्थक ठेकेदाराकडे आहेत. या योजनेची मुदत संपली तरीही कामे अर्धवट स्थितीत आहेत. पाणीटंचाईची वेळेवर कामे पूर्ण न झाल्याने पाणी प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातील पाणी व आरोग्य प्रश्नाला स्थानिक आमदार जबाबदार असून गेली १५ वर्षे तालुक्यातील जनतेच्या पाणीप्रश्न ताटकळत ठेवला असा आरोप सुशांत नाईक यांनी केलाय. अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारणार असा इशाराही नाईक त्यांनी यावेळी दिला.