देवगड गढीताम्हाणे येथे वीज पडल्याने माड जळून खाक ; पिठाच्या चक्कीसह इलेक्ट्रिक सामान जळाल्याने ही नुकसान

562

देवगड गढीताम्हाणे येथे वीज पडल्याने माड जळून खाक ; पिठाच्या चक्कीसह इलेक्ट्रिक सामान जळाल्याने ही नुकसान

देवगड प्रतिनिधी २१ मे २०२४

देवगड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गढिताम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत (संभाजी) विश्वास कदम यांच्या घराजवळ नारळाच्या झाडावरती वीज पडून आग लागल्याने माड जळून खाक झाला आहे.तसेच येथीलच हनुमान कदम यांच्या घराच्या चौथर्‍याला होल पडला आहे. तसेच घरातील सर्व टीव्ही फ्रिज आधी इलेक्ट्रिक सामान, पिठाची चक्की देखील जळाल्याने नुकसान झाले आहे.


देवगड तालुक्यातील सोमवारी सायंकाळी ही असाच वादळीवाऱ्यासह पावसाचा शिडकाव देखील झाला होता. मात्र आज मंगळवारी साडेपाचच्या सुमारास झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे येथे वीज पडून नुकसान झाले आहे . देवगडमध्ये विजांचा कडकडाट सह पाऊस पडला होता या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला होता मात्र या पावसात झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे विज पडून गढीताम्हाणे परिसरात नुकसान झाले असल्याची माहिती अमित कदम यांनी दिली.