कळसुली श्री.स्वामी समर्थ मठात 15 मे ला प्रथम वर्धापन दिन सोहळा

40

कळसुली श्री.स्वामी समर्थ मठात 15 मे ला प्रथम वर्धापन दिन सोहळा

स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष हनुमंत सावंत यांचे आवाहन

कणकवली दि.१२मे ( तुळशीदास कुडतरकर)

प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ (रजि.) कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.स्वामी समर्थ मठ कळसुली येथे प्रथम वर्धापन सोहळा बुधवार १५ मे रोजी साजरा होणार आहे.

श्री.श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे पहिल्या वर्धापनदिना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

15 मे रोजी पहाटे 4.30वाजता काकड आरती, सकाळी 7.00वाजता स्वामींची नित्य पुजा, सकाळीं 8 . 30 लघुरुद्र/महारुद्र , दुपारी 12.00 वाजता महाआरती, दुपारी 3.30 वाजता गुरूचरित्र वाचन,सायं. 5.00 भजने, सायं.7.00हरिपाठ, सायं. 8.00वाजता कीर्तन, रात्री 10.00 वाजता स्थानिक कार्यक्रम, आयोजित करण्यात आले आहेत.

तरी सर्व स्वामी भक्तांनी प्रथम वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.