देवगड बाजारपेठ येथील व्यापारी राकेश पारकर यांचे निधन
देवगड प्रतिनिधी
देवगड मधील युवा व्यवसायिक राकेश श्रीकृष्ण पारकर (४२) याचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे बुधवारी मध्यरात्री निधन झाले त्याच्या पश्चात आई भाऊ वहिनी पुतणे असा परिवार आहे देवगड खालची बाजारपेठ येथील हॉटेल गणेश अँड कोल्ड्रिंकचे ते मालक होते. गुरुवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर देवगड स्मशानभूमी येथे इत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवगडमधील व्यापारी वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते





