Home अपघात बुलेरो टेम्पोला पाठीमागून खाजगी आराम बसची धडक बसल्याने अपघात आराम बसच्या दर्शनी...

बुलेरो टेम्पोला पाठीमागून खाजगी आराम बसची धडक बसल्याने अपघात आराम बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान ; शिरगाव धोपटेवाडी येथील घटना

281

 

देवगड (प्रतिनिधी)९ मे २०२४

बुलेरो टेम्पोला पाठीमागून खाजगी आराम बसची धडक बसल्याने अपघात आराम बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान ; शिरगाव धोपटेवाडी येथील घटना

 

देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी कोणीचे वळणं येथे आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास खाजगी आराम बस व महिंद्रा बोलेरो टेम्पो यामध्ये अपघात झाला. या अपघातात खाजगी आराम बसची दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले .मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी नजीक असलेल्या कोणीचे वळण या ठिकाणी भाजी वाहतूक करणारा महेंद्र बोलेरो टेम्पोचा मागील टायर पंचर झाला होता. पंचर टेम्पोचे चाक काढून वळणावर टेम्पो उभा करून ठेवण्यात आला होता. त्यावेळी मुंबईहून येणाऱ्या खाजगी आराम बसची पाठीमागून धडक या टेम्पोला जोरदार बसल्याने खाजगी आराम बसच्या दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले. धोपटेवाडी येथील या वळणावर रस्त्यावर काचा पडलेल्या दिसत होत्या. दरम्यान मुंबईहून येणाऱ्या खाजगी आराम बसमधील प्रवाशांना दुसऱ्या खाजगी आराम बसने पुढे मार्गस्थ करण्यात आले.मात्र या अपघाताची नोंद उशिरापर्यंत देवगड पोलिसांत करण्यात आली नव्हती.