लोरे नं 1 गावात मशाल निशाणीला मताधिक्य देणार – अनंत पिळणकर
कणकवली (प्रतिनिधी)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी लोरे नंबर 1 येथे घरोघरी फिरून प्रचाराचा झंझावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिणळकर यांनी केला. लोरे नं 1 गावातील प्रत्येक घरोघरी जात अनंत पिळणकर यांनी विनायक राऊत यांचा प्रचार केला.
विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत केलेली विकासकामे, लोकोपयोगी कामे मतदारांपर्यंत पोचवत अनंत पिळणकर यांनी राऊत यांचा प्रचार केला.
प्रचारादरम्यान मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले मत विकासाला आपले मत राऊत यांच्या मशाल निशाणीला असे सांगत प्रतिसाद दिला. यावेळी चंद्रशेखर रावराणे, निलेश रावराणे, रमेश रावराणे, विशाल रावराणे, देवेंद्र पिळणकर, तेजस पिळणकर, प्रीतम रावराणे, योगेश रावराणे, जय रावराणे, स्वप्निल रावराणे, विजय राणे, सुजल शेलार आदी उपस्थित होते.





