आश्वासनाची खैरात, पूर्ततेचा अभाव, आता होणार नोटांची बरसात….

245
Oplus_131072

आश्वासनाची खैरात, पूर्ततेचा अभाव, आता होणार नोटांची बरसात….

आधी काम, मग मतदान …. ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना.

देवगड (प्रतिनिधी)

निवडणुका जवळ आल्या की, राजकीय पुढारी बरीच आश्वासने देतात पण त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही. एकाने मंजूर केलेले काम दुसऱ्याने अडकून ठेवायचे अशा सूडबुद्धीच्या राजकारणामुळे गावचा विकास रखडत आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त की आणि ती ही नोटा चिन्ह लावून आधी काम, मग मतदान. अशा आशयाचे बॅनर देवगड हनुमान मंदिरा नजीक लावले आहे. सध्या हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे
दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच जिल्ह्यात अन्य तालुक्यात सध्या विकास कामावरून ग्रामस्थांनी उठाव करून लावलेले बॅनर चर्चेचा विषय व दोन्ही राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिजेला पोहोचला असताना दुसरीकडे देवगड मधील पवनचक्की व साईनाथवाडी ग्रामस्थांनी आधी काम मग मतदान असा लावलेला बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाही .म्हणून ग्रामस्थांनी त्या रागातून आपली भावना अशा बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेली दिसत आहे. यातून तरी आता राजकीय मंडळींनी बोध घ्यावा अन्यथा भविष्यात या गोष्टी राजकीय पक्षांना घातक ठरू शकतात.