इन्सुली बिलेवाडी येथे श्री सदगुरु आबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त  2 मे रोजी कार्यक्रम

5

इन्सुली बिलेवाडी येथे श्री सदगुरु आबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त  2 मे रोजी कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी)

 
इन्सुली बिलेवाडी येथे श्री सदगुरु आबा महाराज यांची 26 वी पुण्यतिथी निमित्त  सोहळा  दिनांक 2 मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने श्री सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिर बिलेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने सकाळी 10 वाजता पादुका पूजन व अभिषेक, 11 वाजता सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने, आणि रात्री ठीक 10 वाजता सदगुरू नाट्यमंडळ बिलेवाडी निर्मित श्री जागतेश्वर प्रासादिक नाट्यमंडळ यांचा माझ्या सासरच्या मंदिरी हा तीन अंकी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिलेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.