माजी सभापती अंकुश जाधव यांची प्रचारात आघाडी,राणे यांच्यासाठी वाडी वस्त्यांवर जाऊन करत आहेत प्रचार
सावंतवाडी – (प्रतिनिधी)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयात दलित बांधवांचे मोठे योगदान असायला हवे असे भावनिक आवाहन माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी तांबूळी येथे बौद्ध वस्ती येथे समाज बांधवाना केले.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी माजी समाजकल्याण सभापती जाधव रविवारी संध्याकाळी तांबूळी ता.सावंतवाडी येथील बौद्ध वाडी यांनी भेट देत छोटेखानी बैठक घेतली.यावेळी चंद्रकांत वालावलकर,महेश जाधव,निलेश जाधव,ग्रामपंचायत सदस्य सौं जाधव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थ यांनी विविध प्रलंबित विकास कामे नळपाणी योजना,समाजमंदिर,रंगमंच,आदी पूर्ण करून देण्याची मागणी केली.
यावेळी माजी सभापती जाधव यांनी विकासकामे भाजपा च्या वतीने करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.मात्र या निवडणुकीत आम्ही दलित समाजाने राणे यांच्या विजयात मोठं योगदान द्यायला हवं.राणे यांच्या मुळे जिल्ह्याचा विकास झाला आहे.रस्ता,पाणी,आरोग्य याबाबत जिल्हा प्रगती करत आहे.शिवाय बौद्ध वस्त्यांचा विकास जिल्हा परिषद,राज्य सरकार,केंद्र सरकार यांच्या विकास निधीतून होतं आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासन आदेश काढला.त्यामुळे आज गावागावात ग्रामपंचायत स्तरावर जयंती साजरी केली जाते.पण असे काम काँग्रेस सरकार च्या काळात झालं नाही.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुंबई दादर चैत्य भूमी येथे व्हावे म्हूणन मोदी सरकारने एक हजार कोटी च्या दरम्यान निधी मंजूर केला आणि काम आज प्रगती पथावर आहे.लंडन चे घर ही घेऊन त्याचे जतन भाजपा च्या राज्य सरकारने केले. संविधान बदलणार असा पोरकट आणि खोटा प्रचार उबाठा शिवसेना त्याचे मित्र पक्ष करत आहे. ते खोटं आहे. केशवानंद भारती प्रकरण याचा अभ्यास करा. या खटल्यात न्यायालय यांनी निर्णय देत संविधान कोणालाही बदलता येणार नाही निर्णय दिला. काही त्यात बदल करू शकतात. काँग्रेस सरकारणे तब्ब्ल 90 वेळा संविधानात बदल केला आहे. उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांना पराभव समोर दिसत आहे त्यामुळे ते असा खोटा प्रचार करत आहे त्याला दलित समाज आणि मतदार यांनी बळी पडू नये असे आवाहन करत आपल्या सर्वागीण विकाससाठी महायुती चे उमेदवार राणे यांना विजयी करा. या विजयात दलित समाज बांधवांचे मोठे योगदान असायला हवे असे आवाहन उपस्थित समाजबांधवाना केले.यावेळी ग्रामस्थांनी आपण महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजयी करण्यासाठी बांधील आहोत असे स्पष्ट केले त्याच बरोबर आमच्या वाडीचा विकास भाजपाच्या वतीने करावा अशी विनंती केली. आभार निलेश जाधव यांनी व्यक्त केले.



