वैभवशाली परंपरा जपणारे डेगवेतील श्री देव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर…!

सावंतवाडी : तालुक्यातील डेगवे गावासह ४८ खेड्यांचा अधिपती म्हणून नावलौकिक मिळवून आहे. नवसाला पावणारे हे जागृत देवस्थान असून हजारो भाविक सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथून जत्रोत्सवाला येतात.

श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर ४८ खेड्यांचा संस्थानकाळातील अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे. मंदिराचा मुख्य गाभारा तसाच जतन करून मंदिराची आकर्षक बांधणी केली गेली आहे. या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडव्याला होणारा लक्षदीप कार्यक्रम तसेच वार्षिक जत्रोत्सव आधी कार्यक्रम होतात. या कार्यक्रमासाठी हजारो भक्तगण उपस्थितीत असतात.

वैशिस्टपूर्ण असे दक्षिणाभिमुख असणारे हे मंदिर प्राचीन आहे. श्री देव महालक्ष्मी – स्थापेश्वराचे प्राचीन सुबक मूर्ती आजही जतन करून सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवला आहे. हे अतिप्राचिन मंदिर डेगवे गावात आहे. श्री महालक्ष्मी स्थापेशवर चरणी नतमस्तक होऊन भाविक आपले नवस फेडतात व मागणे ही मागतात. भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण होतात.

‘नाम तुझे घेता देवा, होई समाधान’ याची प्रचिती घ्यावी असे आवाहन श्री देव स्थापेश्वर मंदिर ट्रस्टने केले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी डेगवे गाव सज्ज झालं आहे.