कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्ते यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

86

कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्ते यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली दि २६ एप्रिल ( प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सदानंद मोरे,शिवराम मोरे,गणेश मोरे,प्रमोद मोरे,प्रभाकर देसाई,विनोद देसाई,प्रथमेश देसाई,अतुल मोरे,रवी बंटीवरडार,रदीर बेनेटी,परशुराम मोरे,विलास राणे,स्वप्निल राणे,उषा देसाई,प्रतिक्षा देसाई,प्रमिला देसाई,जानवी मोरे,दिशा मोरे,सुहासिनी मोरे ,महेश वारंग,आज ओम गणेश निवासस्थानी येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत,मिलिंद मेस्त्री, राहुल आंगणे सुदर्शन नाईक आदि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणतीही विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले .

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो. असा विश्वास असल्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.