महाळुंगे धनगरवाडी येथील खून प्रकरणातील आरोपी सुनील पेडणेकर यांना देवगड न्यायालयाने २७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

80
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":2,"transform":2,"effects":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

महाळुंगे धनगरवाडी येथील खून प्रकरणातील आरोपी सुनील पेडणेकर यांना देवगड न्यायालयाने २७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

देवगड / प्रतिनिधी

महाळुंगे धनगरवाडी येथील खून प्रकरणातील संशयित आरोपी सुनील सदानंद पेडणेकर (५८) याला देवगड न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेनंतर विजयदुर्ग पोलिसांच्या ताब्यात असणारा संशयित पेडणेकर हा वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल होता. त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.

सुनील पेडणेकर याने १९ एप्रिल रोजी सकाळी आपल्या राहत्या घरात पत्नी सौ. सुप्रिया हिचा धारदार सुरीने वार करून निघृण खून केला होता. या घटनेदरम्यान संशयित पेडणेकर यालाही दुखापत झाल्याने विजयदुर्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले होते. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर विजयदुर्ग पोलिसांनी संशयित पेडणेकर याला अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले. घटनेचा तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.