आर.पी.आय. (आठवले) पक्षाची 21 एप्रिल ला सावंतवाडीत बैठक
कणकवली ( प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुकाध्यक्ष, युवक आघाडी, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांची संयुक्त बैठक रविवार .21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता सावंतवाडी येथील मँगो हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे,
जिल्हाध्यक्ष अजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव – रमाकांत जाधव हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, गेल्या 7 एप्रिल ला जिल्हास्तरीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे कणकवली येथील तांबे भवन मध्ये आयोजन करण्यात आले होते.त्यात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पक्ष व्यापक बनविण्या बाबत, बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकी बाबत चर्चा होणार आहे, पक्षाचे वरिष्ठ नेते यांचा दौरा कार्यक्रमाचे नियोजन करणे तसेच इतर महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस -प्रकाश कांबळे यांनी केले आहे.





