महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
कणकवली (प्रतिनिधी) दि.१४ एप्रिल २०२४
कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी माऊली मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मंडळाचे सदस्य प्रमोदशेट मसुरकर यांच्या उपस्थितीत पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले,यावेळी माऊली मित्र मंडळाचे भगवान कासले, अविनाश गावडे, प्रदीप कुमार जाधव, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर, आदी पदाधिकारी व सदस्य तसेच बौद्ध समाज बांधव सिध्दार्थ वरवडेकर, रविकांत वरवडेकर, राजेंद्र जाधव, काशिनाथ जाधव, बापू जाधव, हरीचंद्र जाधव आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थितीत होते.






